'कथानकाच्या ओघात राष्ट्रगीतासाठी उभं राहण्याची आवश्यकता नाही'

चित्रपट किंवा माहितीपटामध्ये कथानकाच्या ओघात राष्ट्रगीत येत असेल, तर त्यावेळी चित्रपटगृहात उभं राहण्याची आवश्यकता नाही, असं सुप्रीम कोर्टानं स्पष्ट केलंय. एका जनहित याचिकेवर केलेल्या सुनावणीत न्यायमूर्ती दीपक मिश्रा आणि आर.

Updated: Feb 14, 2017, 10:47 PM IST
'कथानकाच्या ओघात राष्ट्रगीतासाठी उभं राहण्याची आवश्यकता नाही' title=

नवी दिल्ली : चित्रपट किंवा माहितीपटामध्ये कथानकाच्या ओघात राष्ट्रगीत येत असेल, तर त्यावेळी चित्रपटगृहात उभं राहण्याची आवश्यकता नाही, असं सुप्रीम कोर्टानं स्पष्ट केलंय. एका जनहित याचिकेवर केलेल्या सुनावणीत न्यायमूर्ती दीपक मिश्रा आणि आर.

भानुमती यांच्या खंडपीठानं हा निवाडा दिलाय. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये प्रत्येक चित्रपटाच्या सुरूवातीला राष्ट्रगीत वाजवलं पाहिजे आणि त्यावेळी प्रत्येकानं आदर दाखवण्यासाठी स्तब्ध उभं राहिलं पाहिजे, असे आदेश दिले होते. त्यानंतर आज चित्रपटांमध्ये येणाऱ्या राष्ट्रगीताबाबत शंकांना न्यायालयानं पूर्णविराम दिला आहे. प्रकरणाची पुढली सुनावणी 18 एप्रिल रोजी होणार आहे.