१० लाखांचं उत्पन्न असेल, तर एलपीजी सब्सिडी बंद होणार

केंद्रीय मंत्री एम व्यंकय्या नायडू यांनी शनिवारी एनडीए सरकारकडून, एलपीजी ग्राहकांना दिली जाणारी सब्सिडी हटवण्याचा विचार सुरू केला आहे. ज्यांचं वार्षिक उत्पन्न १० लाखांपेक्षा अधिक आहे, त्यांची एलपीजी सब्सिडी हटवली जाणार आहे.

Updated: Nov 15, 2015, 02:37 PM IST
१० लाखांचं उत्पन्न असेल, तर एलपीजी सब्सिडी बंद होणार title=

हैदराबाद : केंद्रीय मंत्री एम व्यंकय्या नायडू यांनी शनिवारी एनडीए सरकारकडून, एलपीजी ग्राहकांना दिली जाणारी सब्सिडी हटवण्याचा विचार सुरू केला आहे. ज्यांचं वार्षिक उत्पन्न १० लाखांपेक्षा अधिक आहे, त्यांची एलपीजी सब्सिडी हटवली जाणार आहे.

केंद्रीय शहरी विकास आणि संसदीय कार्यमंत्री नायडू यांनी म्हटलंय, मला पेट्रोलियम मंत्री धमेंद्र प्रधान यांनी माहिती दिली आहे की, सरकारला अनेक अवैध गॅस कनेक्शन्सबद्दल माहिती झाली आहे. अशा ग्राहकांना दिला जाणारा गॅस थांबवून सरकार करोडो रूपये वाचवू शकणार आहे.

10 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्यांना सब्सिडी देण्याची काय गरज आहे, मंत्र्यांना सब्सिडीची काय गरज आहे, आतापर्यंत ३० लाख लोकांनी एलपीजीची सब्सिडी सोडली आहे. ही सब्सिडी गरीब लोकांना देण्याची गरज आहे, असं नायडू यांनी म्हटलंय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.