मुलानं विवाह केला म्हणून काढली आईची नग्न धिंड!

मध्यप्रदेशातल्या भिंड भागात एक धक्कादायक घटना उघडकीस आलीय. मुलानं प्रेमविवाह केला म्हणून गावकऱ्यांनी त्याच्या आईची विटंबना केली. तिचे केस कापले... मारहाण केली... इतक्यावरच त्यांचा राग शांत झाला नाही तर त्यांनी या महिलेची गावात नग्न धिंड काढली.

Updated: Nov 14, 2015, 06:12 PM IST
मुलानं विवाह केला म्हणून काढली आईची नग्न धिंड! title=

भोपाळ : मध्यप्रदेशातल्या भिंड भागात एक धक्कादायक घटना उघडकीस आलीय. मुलानं प्रेमविवाह केला म्हणून गावकऱ्यांनी त्याच्या आईची विटंबना केली. तिचे केस कापले... मारहाण केली... इतक्यावरच त्यांचा राग शांत झाला नाही तर त्यांनी या महिलेची गावात नग्न धिंड काढली.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेच्या मुलानं दुसरा समुदायाच्या मुलीसोबत कोर्ट मॅरेज केलं. यावेळी, परवानगी मिळणार नाही म्हणून कुटुंबीयांना लग्नाबद्दल सांगण्यात आलं नाही. कालच मुलगा आपल्या पत्नीसोबत घरी आला. 

याची माहिती मिळताच मुलीच्या समुदायाचे काही लोक जबरदस्तीनं मुलाच्या घरात घुसले. मुलीची शोधाशोध केली परंतु, ती सापडली नाही त्यामुळे त्यांनी मुलाच्या आईलाच आपल्या निशाण्यावर घेतलं. 

मारहाण करत मुलाच्या आईला घराबाहेर खेचून आणण्यात आलं... निर्वस्त्र करत तिला मारहाण करण्यात आली... तिचे केस कपून तिची गावभर नग्न धिंड काढण्यात आली. यानंतर, हे लोक तिथून फरार झाले.

महिलेच्या कुटुंबीयांनी तिला गंभीर अवस्थेत हॉस्पीटलमध्ये दाखल केलं. इथून तिला उपचारासाठी ग्वालियरला पाठवण्यात आलंय. महिलेच्या पतीनं आरोपींविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केलीय. 

दरम्यान, या घटनेची मध्यप्रदेश मानवाधिकार आयोगानंही गंभीर दखल घेतलीय. आयोगानं पोलीस अधिक्षकांना लवकरात लवकर या घटनेचा अहवाल सादर करण्यास सांगितलंय. पोलिसांनी ही घटना गंभीरतेनं घेतली नसल्याचा आरोप आयोगानं केलाय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.