प्रभूंच्या बजेटमध्ये कोणत्याही नव्या गाड्यांची घोषणा नाही

मूळचे महाराष्ट्रातील असलेले रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी आपल्या पहिल्या वहिल्या रेल्वे बजेटमध्ये कोणत्याही नवीन गाड्यांची घोषणा केलेली नाही. 

Updated: Feb 26, 2015, 01:47 PM IST
प्रभूंच्या बजेटमध्ये कोणत्याही नव्या गाड्यांची घोषणा नाही title=

नवी दिल्ली: मूळचे महाराष्ट्रातील असलेले रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी आपल्या पहिल्या वहिल्या रेल्वे बजेटमध्ये कोणत्याही नवीन गाड्यांची घोषणा केलेली नाही. 

एक सर्व्हे करून मगच नव्या रेल्वेची घोषणा करणार असल्याचं प्रभू यांनी आपल्या बजेट भाषणाच्या शेवटी सांगितलं. महाराष्ट्र आणि मुंबईसाठी त्यांनी कोणतीही विशेष घोषणा केली नाहीय. नवीन गाड्यांची घोषणा न करताच प्रभूंनी त्यांच्या भाषणाचा समारोप केला. त्यामुळं अनेक जण नाराज झाले आहेत. 

रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी प्रमुख चार मुद्द्यांवर काम करणं हेच आमचं ध्येय आहे, असं म्हटलंय. कोणते हे मुद्दे पाहा -
१. प्रवाशांच्या गरजा आणि आवश्यकता समजून घेणं
२. रेल्वेला सुरक्षित करणे आवश्यक
३. रेल्वेला मॉर्डनाईज करणे गरजेचं
४. रेल्वेला आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र करणं

रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी काही महत्त्वाच्या घोषणा केल्यात त्यातील टॉप १० घोषणा पाहा - 

१. प्रवासी भाड्यात कोणतीही वाढ नाही
२. तिकीट ४ महिने आधी उपलब्ध होणार
३. मुंबईत लवकरच एसी लोकल
४. जनरल डब्ब्यात मोबाईल चार्जिंग, ए आणि बी दर्जाच्या स्टेशनवर वाय-फाय
५. हेल्पलाईन नंबर १३८, रेल्वेसंदर्भात माहिती, तक्रारींसाठी मोबईल अॅप
६. स्टेशन आणि रेल्वे स्वच्छतेसाठी नवा विभाग
७. मानवविरहित फाटकांवर अलार्म
८. बुलेट ट्रेनचं कामकाज याच वर्षी सुरू करणार
९. महिलांच्या डब्ब्यात सीसीटीव्ही
१०. देशातील ४ विद्यापींठांत रेल्वे संशोधन अभ्यासक्रम

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.