असे आहेत, पैसे भरणे, काढण्याचे नवे नियम

केंद्रीय अर्थ सचिव शक्तिकांत दास यांनी आज एक पत्रकार परिषद घेऊन, देशातील बँका आणि एटीएमवर लांबलचक दिसणाऱ्या रांगा लहान करण्यासाठी काय उपाय केल्याची माहिती दिली. 

Updated: Nov 15, 2016, 04:09 PM IST
असे आहेत, पैसे भरणे, काढण्याचे नवे नियम title=

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थ सचिव शक्तिकांत दास यांनी आज एक पत्रकार परिषद घेऊन, देशातील बँका आणि एटीएमवर लांबलचक दिसणाऱ्या रांगा लहान करण्यासाठी काय उपाय केल्याची माहिती दिली. 

तसेच बँकेत पैसे भरणे, काढणे याला काय मर्यादा असतील याची देखील माहिती दिली, ती माहिती पुढील बँक व्यवहार करण्यासाठी महत्वाची आहे.

१) नोटा एक्सचेंज करण्यासाठी आज बँकांनी, नोटा बदलवण्यासाठी येणाऱ्यांच्या हाताला शाई लावण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे एकच व्यक्ती पुन्हा नोटा बदलण्यासाठी येणार नाही. निव़डणुकीत बोटाला शाई लावतात त्याप्रमाणे ही शाई लावली जाणार आहे.

२) बँकांमध्ये आता जास्तच जास्त ४५०० रूपये बदलून दिले जाणार आहेत,  एटीएममधून २५०० रूपये काढता येणार आहेत.

३) बँकेत भरणा करताना कोणतीही मर्यादा ठेवण्यात आलेली नाही, तुम्ही बँकेत ते पैसे भरू शकतात.

४) जनधन खात्यात काळा पैसा जमा करण्यावर नजर असल्याचंही सरकारने आज सांगितलं, जनधन खात्यात फक्त ५० हजार रूपये जमा करता येणार आहेत.
जनधन खात्यातील ज्या लोकांनी ४९ हजार रूपये जमा केले आहेत, त्यांना देखील प्रश्न विचारले जाऊ शकतात, असंही सांगण्यात आलं  आहे.

५) जे सरकारी हॉस्पिटल आणि मेडिकल स्टोअर, फार्मसी ५०० ते १००० च्या जुन्या नोटा घेण्यास नकार देत आहेत, त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. सरकारने वरील ठिकाणी २४ नोव्हेंबर पर्यंत जुन्या नोटा घेण्याचे आदेश दिल्यामुळे, त्यांनी नकार देऊ नये, असंही सांगण्यात आलं आहे.

६) मंदिर आणि ट्रस्टना सांगण्यात आलं आहे की, सुट्टै पैसे देखील बँकेत जमा करा - अर्थ सचिव शक्तिकांत दास

७) अफवांवर विश्वास ठेऊ नका, मीठ महागण्याची अफवा ही अखेर अफवाच ठरली.

६) लग्नसभारंभातील आहेर देखील रोख देण्याची गरज नाही, त्यासाठी चेकचा वापर करा, खर्चासाठी बँकेतून पैसे काढण्याची सीमा २५००० हजार रूपये करण्यात आली आहे. एटीएममधूनही दिवसाला २५०० रूपये निघू शकतात.

७) बँका-एटीएमसमोरील लाईन्स लहान करण्यासाठी सरकारने आज हा निर्णय घेतला आहे. ज्या माणसाला एकदा पैसे मिळाले, त्या माणसाने गरजेपुरता पैसे संपेपर्यंत बँकेत न येण्यासाठी हा उपाय असल्याचं म्हटलंय.