www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
यापुढे जे नविन रेल्वेचे डब्बे (कोच) तयार करण्यात येतील त्यामध्ये सीसीटीव्ही कॅमेरा असणार आहेत. तशी तयारी रेल्वे विभागाने केली असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.
रेल्वेची सुरक्षा आणि प्रवाशांचा सुरक्षित प्रवास यासाठी नविन रेल्वे कोचमध्ये सीसीटीव्ही लावण्याचा निर्णय घेण्यात आले आहे. रेल्वे सुरक्षा बल अधिकाऱ्यांने सांगितले, सीसीटीव्ही कॅमेरा जवळपास 1000 रेल्वेमध्ये लावण्यात येणार आहे.
रेल्वेत वाढणाऱ्या चोऱ्या रोखण्यासाठी आणि रेल्वेवर पडणारा दरोडा यापार्श्वभूमीवर रेल्वेने हा निर्णय घेतला आहे. पहिल्यांदा सामान्य श्रेणीतील डब्यांमध्ये कॅमेरा लावला जाणार आहे. रेल्वेकडून वाहतूक शाखा विभागाशी चर्चा सुरु असल्याचे सांगतिले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.