एक पैसाही घेतला नाही - अरुण जेटली

अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि अन्य काही आप नेत्यांविरोधात पटियाला हाऊस कोर्टामध्ये मानहानीची तक्रार दाखल केली आहे. 

Updated: Dec 21, 2015, 03:54 PM IST
एक पैसाही घेतला नाही - अरुण जेटली title=

नवी दिल्ली : अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि अन्य काही आप नेत्यांविरोधात पटियाला हाऊस कोर्टामध्ये मानहानीची तक्रार दाखल केली आहे. 

जेटलींनी कोर्टात म्हटलं की 'डीडीसीएमधून एक पैसा ही घेतला नाही तरी केजरीवाल आणि अन्य काही लोकं त्यांच्यावर खोटे आणि अपमाजनक आरोप करत आहेत. 

अरविंद केजरीवाल यांच्यासहीत कुमार विश्वास, आशुतोष, संजय सिंह, राघव चड्डा आणि दीपक वाजपेयी या ५ आप नेत्यांवर १० कोटींचा मानहानीचा दावा करण्यात आला आहे. 

कोर्ट या प्रकरणावर ५ जानेवारी रोजी सुनावणी करणार आहे. याच दिवशी साक्षीदारांच्या साक्षीही नोंदवल्या जाणार आहेत.