नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत थोड्याच वेळात एनडीएच्या घटकपक्षांची बैठक होणार आहे. या बैठकीला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेही उपस्थित राहणार आहेत.
येत्या जुलै महिन्यात होत असलेच्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा मुद्दा बैठकीच्या केंद्रस्थानी असण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे भाजपच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराला पाठिंबा देणार असल्याची महिती सूत्रांनी दिली आहे. या बैठकीत शिवसेना भाजप संबंध सुरळीत करण्यावरही आजच्या भेटीत चर्चा होणार असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे.
अनेक राष्ट्रीय विषयांवर या बैठकीत चर्चा अपेक्षित आहे. सुमारे तीन वर्षांनंतर म्हणजेच नरेंद्र मोदी यांची पंतप्रधानपदी निवड झाल्यानंतर दिल्लीत मोदी-भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि उद्धव ठाकरे एकत्र असतील.