छत्तीसगड : नक्षलवाद्यांशी लढतांना वडगावचा युवक शहीद

 छत्तीसगड राज्यातील सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यामध्ये तासगाव तालुक्यातील वडगावचा उमाजी शिवाजीराव पवार हा केंद्रीय राखीव पोलिस दलाचा जवान शहीद झाला. 

Updated: Dec 2, 2014, 11:15 PM IST
छत्तीसगड : नक्षलवाद्यांशी लढतांना वडगावचा युवक शहीद title=

सांगली :  छत्तीसगड राज्यातील सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यामध्ये तासगाव तालुक्यातील वडगावचा उमाजी शिवाजीराव पवार हा केंद्रीय राखीव पोलिस दलाचा जवान शहीद झाला. 

उमाजी पवार हा 2009 मध्ये केंद्रीय राखीव पोलिस दलात भरती झाला होता. रायपूर हे मुख्यालय असलेल्या 223 कोब्रा पथकामध्ये सध्या तो कार्यरत होता. 

सुकमा जिल्ह्यातील कोंटा तालुक्‍यातील दोरनापाल पासून 32 कि. मी.अंतरावरील कसनपारा येथे जंगलात नक्षलवाद्यांनी स्थानिक गावकऱ्यांना समोर ठेवून सीआरपीएफ च्या कोब्रा तुकडीवर सोमवारी हल्ला केला. 

या जंगलात नक्षलवादी मोठ्या संख्येने गोळा झाल्याची माहिती केंद्रीय राखीव पोलिस दलाला मिळाली होती. त्यानुसार स्थानिक पोलिसांच्या मदतीने कारवाई करण्यात येत होती. त्यामध्ये 16 जवानांना वीरमरण आले. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.