शहीद सैनिकाच्या गावकऱ्यांनी मंत्र्यांना बनवलं बंधक!

मुख्यमंत्री नीतिश कुमार यांनी पाचारण करावं यासाठी शहीद सैनिक प्रेमनाथ सिंगच्या गावातील लोकांनी शुक्रवारी बिहारमधील एका मंत्र्याला सुमारे दोन तास बंधक बनवून ठेवलं

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Aug 10, 2013, 05:01 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, पटणा
मुख्यमंत्री नीतिश कुमार यांनी पाचारण करावं यासाठी शहीद सैनिक प्रेमनाथ सिंगच्या गावातील लोकांनी शुक्रवारी बिहारमधील एका मंत्र्याला सुमारे दोन तास बंधक बनवून ठेवलं. नियंत्रण रेषेवर ज्या पाच सैनिकांची हत्या झाली, त्यांच्यातील एक प्रेमनाथ सिंग होते.
सारण जिल्ह्यात मांझी येथील आमदार गौतम सिंग श्रद्धांजली देण्यासाठी शहीद प्रेमनाथ सिंग यांच्या घरी आले होते. त्याचवेळी गावकऱ्यांनी गौतम सिंग यांना ताब्यात घेतलं. खुद्द मुख्यमंत्र्यांनी श्रद्दांजली देम्यासाठी यावं, अशी मागणी यावेळी गावकऱ्यांनी केली. ताब्यात घेतलेल्या मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांशी फोनवरून बोलण्याची जबरदस्ती गावकऱ्यांनी केली. विज्ञान आणि प्रौद्योगिक राज्यमंत्री गौतम सिंग यांना सुमारे दोन तास बंधक बनवून ठेवलं गेलं. अखेर गावातील ज्येष्ठ नागरिकांनी हस्तक्षेप करून मंत्र्यांची सुटका केली.
दिल्ली येथे गेलेले गौतम सिंग गुरूवारी प्रेमनाथ सिंग यांच्या अंत्यसंस्कारांना उपस्थइत नव्हते. दिल्लीहून आल्यावर जेव्हा, ते शहिदाच्या घरी गेले, तेव्हा ही घटना घडली. याशिवाय रघुनंदन प्रसाद या दुसऱ्या सैनिकाच्या आईने नीतिश कुमार यांचे मंत्र भीमसिंग यांच्या अपमानकारक वक्तव्यावर राज्य सरकारने दिलेला १० लाख रुपयांचा चेक परत करणाऱ असल्याचं म्हटलं आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.