हेराल्ड प्रकरणी बदला घेण्याच्या उद्देशानं नोटीस- सोनिया

नॅशनल हेराल्ड केस प्रकरणी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनी प्रतिक्रिया व्यक्त केलीय. बदला घेण्याच्या उद्देशानं आपल्याला नोटीस पाठवल्याचा त्यांनी आरोप केलाय. 

Updated: Jul 9, 2014, 03:19 PM IST
हेराल्ड प्रकरणी बदला घेण्याच्या उद्देशानं नोटीस- सोनिया title=

नवी दिल्ली: नॅशनल हेराल्ड केस प्रकरणी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनी प्रतिक्रिया व्यक्त केलीय. बदला घेण्याच्या उद्देशानं आपल्याला नोटीस पाठवल्याचा त्यांनी आरोप केलाय. 

सोनिया गांधींना आयकर विभागानं नोटीस पाठवली होती. याप्रकरणी त्यांना दिल्लीतल्या एका न्यायालयानं समन्स जारी केलेत. या प्रकरणी सोनिया आणि राहुल गांधी यांना 7 ऑगस्टपूर्वी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिलेत.

भारतीय जनता पक्षाचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांच्या तक्रारीवरून हा समन्स जारी करण्यात आलाय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.