राष्ट्रगीत खाजगी शाळांनाही अनिवार्य- न्यायालय

मद्रास उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार, खाजगी शाळांमध्येही सकाळच्या प्रार्थनेच्या वेळी राष्ट्रगीत गाणे अनिवार्य आहे. 

Updated: Mar 6, 2016, 08:24 PM IST
राष्ट्रगीत खाजगी शाळांनाही अनिवार्य- न्यायालय title=

चेन्नई : मद्रास उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार, खाजगी शाळांमध्येही सकाळच्या प्रार्थनेच्या वेळी राष्ट्रगीत गाणे अनिवार्य आहे. 

तसेच, खाजगी शाळांमध्ये राष्ट्रगीत होते की नाही, याची तपासणी करण्याचे आदेशही न्यायालयाने राज्यातील शिक्षण आणि केंद्रातील मनुष्यबळ विकास खात्याला दिले आहेत.

भारतीय लष्कराचे निवृत्त अधिकारी एन. सेल्वातिरुमल यांनी यासंदर्भात एक जनहित याचिका दाखल केली होती. राष्ट्रगीत काही खाजगी शाळांमध्ये घेण्यात येत नाही, त्यामुळे सर्व शाळांमध्ये राष्ट्रगीत म्हणणे अनिवार्य करावे; अशी मागणी त्यांनी केली होती.