मोदी सरकारच्या काळात गोडसेची मंदीरं? कशासाठी?

राष्ट्रपिता महात्मा गांधींची हत्या करणाऱ्या नथुरामची मंदिर उभारण्याचं कृत्य हिंदू महासभेचा सदस्य मदन शर्मा करत आहे. त्यावर आता गुन्हाही दाखल झालाय. मात्र, हे सगळं कशासाठी हा अनुत्तरीत प्रश्न यातून निर्माण झालाय.

Updated: Dec 27, 2014, 11:16 AM IST
मोदी सरकारच्या काळात गोडसेची मंदीरं? कशासाठी? title=

नवी दिल्ली : राष्ट्रपिता महात्मा गांधींची हत्या करणाऱ्या नथुरामची मंदिर उभारण्याचं कृत्य हिंदू महासभेचा सदस्य मदन शर्मा करत आहे. त्यावर आता गुन्हाही दाखल झालाय. मात्र, हे सगळं कशासाठी हा अनुत्तरीत प्रश्न यातून निर्माण झालाय.

ज्याने गांधीजींची हत्या केली त्याचं मंदिर कशासाठी? मोदी सरकार आल्यावर गोडेसेची मंदिरं कशासाठी? अखिल भारतीय हिंदू महासभेचा सदस्य आचार्य मदन शर्मानं ‘गांधींजींची हत्या करणारा नथुराम गोडसे महान देशभक्त होता... त्याची पूजा व्हावी... त्याचं मंदिर बनावं...’ असा दावा केलाय. नथुरामच्या मंदिराचं मेरठमध्ये भूमीपूजनही करण्यात आलं.

या भूमीपूजनाची माहिती मिळाल्यावर प्रशासन खडबडून जागं झालं. तातडीने केस दाखल झाली. स्थानिक गुप्तवार्ता संस्थेचा रिपोर्टही सादर करण्यात आला. मेरठच्या मंदिराने उडालेला धूरळा खाली बसतो ना बसतो तोवर सीतापूरमध्येही अशा मंदिराचं भूमीपूजन करण्यात आलं. नथूरामच्या मंदिरांचं भूमीपूजन झाल्यावर मग राजकारण सुरू झालं...

काय सांगतो कायदा?
या विषयावर राजकारण सुरू असतानाच कायदा काय सांगतो ते पाहणंही महत्त्वाचं आहे. महात्मा गांधींचा मारेकरी असलेल्या नथूराम गोडसेचं मंदिर उभारणं देशद्रोही कृती आहे. मंदिर उभारणाऱ्यांविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल होऊ शकतो. त्यांच्यावर समाजात तेढ निर्माण करण्याचा गुन्हाही दाखल होऊ शकतो. तसंच स्थानिक प्रशासनाच्या परवानगीशिवाय उभारलेलं हे मंदिर कधीही तोडता येऊ शकतं, असं आपला कायदा सांगतोय. 

३० जानेवारी १९४८ या दिवशी गांधीजींची नथुराम गोडसेनं गोळ्या झाडून हत्या केली होती. कोर्टाने गोडसेला दोषी ठरवल्यावर १५ नोव्हेंबरला गोडसेला अंबाला जेलमध्ये फाशी देण्यात आली. अशा इसमाचं मंदिर कशासाठी? तसंच ६६ वर्षांनंतर गोडसेच्या मंदिराची आठवण हिंदू महासभेला का आली?  मोदी सरकार आल्यावर गोडेसेची मंदिरं का उभी राहात आहेतय़ हे प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.