राजकोट : भारतीय समाजाच्या मानसिकतेचा ठाव लागणं खरंच कठीण आहे. एकिकडे चंद्रानंतर मंगळावर जाणारा भारत आहे. तर दुसरीकडे पराकोटीच्या व्यक्तीपूजेला कवटाळून बसलेलं भारतीय समाजमन आहे. याचं उदाहरण गुजरात राज्यातल्या राजकोट जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतं.
राजकोटमधल्या एका गावात चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं थेट मंदिरच साकारण्यात आलंय. या मंदिरात दरदिवशी सकाळ, संध्याकाळ मोदी पुतळ्याला हार आणि फुलं वाहिली जातात. शिवाय पूजा तसंच आरतीही केली जाते. मात्र या मोदी भक्तांना हे लक्षात येत नाही की, स्वतः मोदी यांनी वारंवार सांगितलेला समृद्ध भारत हा पूजा आरतीनं नाही तर मेहेनतीनं साकारणार आहे.
यावरूनच, पंतप्रधान मोदींनी कार्यकर्त्यांची कान उखडणी केलीय... तीही सोशल वेबसाईट ट्विटरवरून... ट्वीटरवरुन नरेंद्र मोदींनी या घटनेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केलीय.
'माझं मंदिर उभारणं ही धक्कादायक तितकीच दु:ख देणारी गोष्ट आहे. अशी मंदिरं बांधणं हे आपल्या संस्कृतीला शोभणारं नाही. तुमच्याकडे असणारा वेळ आणि श्रम हे स्वच्छ भारत अभियानाला द्या. कार्यकर्त्यांच्या अशा वागण्याचं मला अत्यंत वाईट वाटतंय. तुमच्याकडून अशी चूक पुन्हा होणार नाही अशी अपेक्षा' असं ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ट्विटर अकाऊंटवर म्हटलं गेलंय.
Building such Temples is not what our culture teaches us. Personally, it made me very sad. Would urge those doing it not to do it.
— Narendra Modi (@narendramodi) February 12, 2015
If you have time & resources, please devote the same towards fulfilling our dream of a Clean India.
— Narendra Modi (@narendramodi) February 12, 2015
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.