www.24taas.com, झी मीडिया, भोपाळ
मुख्यमंत्री कन्यादान योजनेअंतर्गत बैतूल जिल्ह्यातील चिंचोली ब्लॉकच्या हरदू गावात शुक्रवारी आयोजित केलेल्या सामूहिक विवाहच्या सोहळ्यात ३५० युवतींच्या व्हर्जिनिटी टेस्टचा मुद्दा समोर आला आहे. यामध्ये ९० आदिवासी युवतींचा समावेश आहे.
सामूहिक विवाह सोहळ्यात मुलींच्या अचानक झालेल्या गर्भ परीक्षणावरून हा मुद्दा उचलला गेलाय. यामुळे बैतूल जिल्हा कलेक्टर राजेश प्रसाद मिश्रा यांनी लग्नाआधी व्हर्जिनिटी टेस्ट आणि गर्भ परीक्षणाच्या घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
मिश्रा यांनी असही सांगितल की, शुक्रवारी मुख्यमंत्री कन्यादान योजनेअंतर्गत आयोजित सामूहिक विवाहादरम्यान आलेल्या तक्रारीची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. बैतूलच्या सहाय्यक कलेक्टर या प्रकरणाची चौकशी करतील. त्यांना आठवड्याभरात चौकशीचा रिपोर्ट सादर करण्यास सांगितला आहे.
या मुद्दयावरून विधानसभेत विरोधी पक्षनेते अजय सिंग यांनी दोषी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या विरोधात कडक कारवाई करण्याची मागणी करतानाच मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांनी आदिवसींची तसेच महिलांची माफी मागावी असेही सांगितले.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.