राज्यघटनेत बदल करण्याचा विचार म्हणजे आत्महत्या : मोदी

राज्यघटनेत बदल करण्याबाबत सुरू असलेली चर्चा म्हणजे केवळ अफवा असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले. या वादावर मोदी यांनी आज पडदा टाकण्याचे काम केले. राज्यघटनेत बदल करण्याचा विचार म्हणजे आत्महत्या होय, असे मोदी म्हणालेत.

Updated: Nov 27, 2015, 08:08 PM IST
राज्यघटनेत बदल करण्याचा विचार म्हणजे आत्महत्या : मोदी title=

नवी दिल्ली : राज्यघटनेत बदल करण्याबाबत सुरू असलेली चर्चा म्हणजे केवळ अफवा असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले. या वादावर मोदी यांनी आज पडदा टाकण्याचे काम केले. राज्यघटनेत बदल करण्याचा विचार म्हणजे आत्महत्या होय, असे मोदी म्हणालेत.

संविधानावर सुरू असलेल्या चर्चेदरम्यान केलेल्या भाषणात मोदी यांनी हे स्पष्ट केले आहे. राज्यघटनेत बदल करण्याचा विचार करणंही आत्महत्या करण्यासारखं असल्याचं मोदींनी नमूद केलं. तसंच आरक्षणाचंही जोरदार समर्थन करत समाजातल्या दलित, शोषित आणि पीडितांना संधी मिळावी, असा उदात्त हेतू ठेवूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षणाचा विचार केल्याचं मोदींनी अधोरेखीत केलं. 

संविधान दिनाच्या पार्श्वभूमीवर संसदेत सुरू असलेली राज्यघटनेवरील चर्चेचा पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांच्या निवेदनानं समारोप झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात तयार झालेली राज्यघटनाच सरकार चालवायला आणि विरोध करायला मार्गदर्शक ठरल्याच पंतप्रधानांनी लोकसभेत नमूद केलं. 

संविधान दिनाची म्हणजे २६ नोव्हेंबरची खरी शक्ती ही प्रजासत्ताक दिनात म्हणजे २६ जानेवारीत असल्याचं मोदींनी सांगितले. देशाच्या प्रगतीत सर्वच सरकारांचे योगदान असल्याचे मोदी यांनी नमूद केले.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.