नरेंद्र मोदींच दिल्ली विधानसभेचं रणशिंग

लोकसभेनंतर एकामागून एक विधानसभा निवडणूक जिंकून शिक्का मोर्तब करणारे, नरेंद्र मोदी आता दिल्लीच्या निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार आहेत. दिल्ली विधानसभेचं ते रणशिंग फुंकणार आहेत.

Updated: Jan 10, 2015, 12:06 PM IST
नरेंद्र मोदींच दिल्ली विधानसभेचं रणशिंग title=

नवी दिल्ली : लोकसभेनंतर एकामागून एक विधानसभा निवडणूक जिंकून शिक्का मोर्तब करणारे, नरेंद्र मोदी आता दिल्लीच्या निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार आहेत. दिल्ली विधानसभेचं ते रणशिंग फुंकणार आहेत.

दिल्ली विधानसभेच्या निवडणूक सभेसाठी दिल्ली भाजप आणिम रामलीला मैदान हे दोन्ही सज्ज झाले आहेत. मोदींच्या सभेनंतर दिल्लीतील निवडणूक तारखा रविवारी घोषित होण्याची शक्‍यता आहे.

या निमित्ताने राजकीय खेळही रंगला असून, आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याचे आपले आश्‍वासन मोदी उद्या पाळणार काय, असा सवाल उपस्थित केला आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.