फोटोसाठी झकरबर्गला ढकलणारे मोदी ‘बालिश’ - काँग्रेस

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फेसबुकचा संस्थापक मार्क झकरबर्गला, फोटोला पोझ देण्यासाठी हात धरून बाजूला केलं. यावर काँग्रेसने नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करतांना म्हटलंय, फोटोसाठी झकरबर्गला ढकलणारे मोदी ‘बालिश’ आहेत.

Updated: Sep 30, 2015, 06:05 PM IST
फोटोसाठी झकरबर्गला ढकलणारे मोदी ‘बालिश’ - काँग्रेस title=

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फेसबुकचा संस्थापक मार्क झकरबर्गला, फोटोला पोझ देण्यासाठी हात धरून बाजूला केलं. यावर काँग्रेसने नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करतांना म्हटलंय, फोटोसाठी झकरबर्गला ढकलणारे मोदी ‘बालिश’ आहेत.

मोदी प्रसारमाध्यमांमध्ये नेहमी चर्चेत राहण्यासाठी काही ना काही उपक्रम करत असतात. मात्र हा प्रकार मोदी आजही शाळेतील मुलासारखे वागत असल्याची बोचरी टीका काँग्रेसचे प्रवक्ते शकील अहमद यांनी केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फेसबुकच्या मुख्यालयाला भेट देतेवेळी फोटोप्रेमासाठी मार्क झकरबर्गच्या बखोटीला धरून बाजूला केल्याची चित्रफीत समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्यानंतर ही वाद पुढे आला आहे, कारण काँग्रेसने मोदी यांचे हे वागणे बालिश असल्याची टीका केली आहे.

फेसबुकच्या मुख्यालयाला भेट देण्यासाठी पंतप्रधान मोदी गेले होते. तेव्हा फेसबुकच्या सीओओ शेरिल सँडबर्ग यांनी एक स्मृतीचिन्ह मोदींना भेट दिले. याविषयीची माहिती देण्यासाठी झकरबर्ग मोदी यांच्या जवळ गेले. 

हे क्षण टिपत छायाचित्रकार टिपत असताना झकरबर्ग त्यांच्याकडे पाठ करून मध्येच आल्याने मोदी यांनी त्यांना बोलता-बोलता बखोटीला धरून बाजूला केले. या प्रकारानंतर झकरबर्ग यांचा चेहरा पाहण्यासारखा होता. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.