नवी दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या भारत दौऱ्याची बरीच चर्चा ते गेल्यानंतरही सुरूच आहे. या चर्चेतलाच एक विषय म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सूट... ओबामा यांच्यासोबत संयुक्त पत्रकार परिषदेत परिधान केला होता...
ओबामांसोबतच्या कार्यक्रमात उपस्थित राहण्यासाठी नरेंद्र मोदी यांच्यासाठी हा खास सूट डिझाईन करण्यात आला होता. या सूटचं वैशिष्ट्यं म्हणजे, नरेंद्र मोदी यांच्या ड्रेसची किंमत आहे तब्बल नऊ लाख रुपये... निळ्या रंगाच्या या सूटवर पिवळ्या रंग्याच्या पट्ट्या दिसत आहेत... या पट्ट्या निव्वळ पिवळ्या पट्ट्या नव्हत्या तर त्यावर काही अक्षरं लिहिलेली होती. यावर, इंग्रजीमध्ये लिहिलेलं होतं 'नरेंद्र दामोदर दास मोदी'...
'हॉलंड अॅन्ड शेरी'च्या अशा प्रकारचा पूर्ण सूट बनविण्यासाठी पूर्ण सात मीटर कपड्याची आवश्यकता असते. ज्याची किंमत दोन लाख अठ्ठ्याहत्तर हजार दोनशे पन्नास (2,78,250) रुपयांपर्यंत जाते. 'हॉलंड अॅन्ड शेरी' या कंपनीनं मात्र यावर कोणतीही प्रतिक्रिया देणं टाळलंय. वैयक्तिक माहिती जाहीर करू शकत नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे.
हा सूट मोदींनी अहमदाबादच्या के. झेड. ब्ल्यू. टेलरकडून शिवून घेतला होता. मोदींचा हा ड्रेस म्हणजे एक उत्तम नमूना असल्याचं फॅशन डिझायनर सामंत चौहान यांनी म्हटलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.