नैनिताल: उत्तराखंड राज्यातली राष्ट्रपती राजवट हटवण्यात आली आहे. नैनिताल हायकोर्टानं हा महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. या निर्णयानंतर उत्तराखंडचे मुख्यमंत्री हरीश रावत यांनी डेरहाडूनमधल्या त्यांच्या निवासस्थानी बैठक बोलावली आहे.
29 एप्रिलला उत्तराखंड विधानसभेत हरीश रावत सरकारला फ्लोअर टेस्टला सामोरं जावं लागणार आहे. दरम्यान अंतिमतः सत्याचा विजय झाला आहे. आम्ही कोर्टाच्या निर्णयाचा सन्मान करतो अशी प्रतिक्रिया हरीश रावत यांनी यावर व्यक्त केलीय.
राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस केंद्र सरकारनं राष्ट्रपतींकडे केली होती. त्यावर राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर 27 मार्चला उत्तराखंड राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती.