नवी दिल्ली : 'निर्भया' गँगरेप घटनेला आज तीन वर्ष पूर्ण झाले. यावेळी आपल्या मुलीचे नाव ज्योति सिंह होते आणि तिचे नाव जगासमोर आणायला मला काही लाज वाटत नाही, असे निर्भया म्हणून सर्वजण ओळखत असलेल्याच्या आईने आज सांगितले.
आज ठीक तीन वर्षांपूर्वी राजधानी दिल्लीत चालत्या बसमध्ये मेडिकलची विद्यार्थीवर सामुहिक बलात्कार झाला होता. 'निर्भया'च्या आईने न्यायासाठी आपला लढा कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावेळी त्या म्हटल्या माझ्या मुलीचे नाव ज्योति सिंह आहे आणि ते जगासमोर आणण्यात मला काही लाज वाटत नाही.
सामुहिक बलात्काराची शिकार बनलेल्या विद्यार्थीनीचा १३ दिवसांनंतर मृत्यू झाला होता. या प्रकरणात दोषी ठरलेल्या सर्वात कमी वयाच्या आरोपीची लवकरच सुटका होणार आहे. या घटनेने सर्व देशाला हादरवले होते. आपल्या मुलीचे आठवण काढताना आशा देवी म्हणाल्या, अखेर आम्हांला न्याय कधी मिळणार मला नाही माहिती की सर्वात कमी वयाचा दोषी १६ वर्षांचा आहे की १८ वर्षांचा आहे. दोषीला सोडले नाही पाहिजे.