भोपाळ : मध्यप्रदेशात महिलेने एकाचं लिंग कापलं आहे. बलात्कार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीचे आदिवासी महिलेने लिंग कापलं आहे. ही घटना उमारिया जिल्ह्यात घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोवार्दे गावात रविवारीरात्री ही घटना घडली. २९ वर्षाच्या रामकरण प्रजापती याने गावातील एका महिलेवर बलात्काराचा प्रयत्न केला.
महिलेने धारदार चाकूने त्याचे लिंग कापले. यामुळे रामकरण रक्तबंबाळ झाला. उपचारासाठी तो स्वतःहून रुग्णालयात दाखल झाला होता.
यावेळी डॉक्टरांनी माहिती घेऊन पोलिसांकडे तक्रार दाखल केली. दरम्यान, रामकरणवर मनपूर येथील सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.