गावातील सर्वात सुशिक्षित मुलगी करणार झेंडावंदन

चंदीगढ : स्त्री भ्रूणहत्येसारख्या समस्येशी झुंजणाऱ्या हरयाणा राज्याने आता बेटी बचाव मोहिमेच्या माध्यमातून एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

Updated: Jan 25, 2016, 11:44 AM IST
गावातील सर्वात सुशिक्षित मुलगी करणार झेंडावंदन title=

चंदीगढ : स्त्री भ्रूणहत्येसारख्या समस्येशी झुंजणाऱ्या हरयाणा राज्याने आता बेटी बचाव मोहिमेच्या माध्यमातून एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

यंदाच्या प्रजासत्ताक दिनाला राज्यातील गावांमध्ये होणाऱ्या कार्यक्रमांत गावातील सर्वाधिक सुशिक्षित तरुणीच्या हस्ते झेंडावंदन केले जाईल, असा निर्णय येथील सरकारने घेतला आहे

तसेच गावात जानेवारी ते डिसेंबर २०१५ या काळात ज्या घरात एका मुलीचे जन्म झाला आहे अशा प्रत्येक कुटुंबाला प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमांचे आमंत्रण देण्यात आले आहे. विशेष म्हणजे हे आमंत्रण त्या बालिकेच्या नावाने दिले गेले आहे.

मुलींना सन्मान मिळावा यासाठी सरकार हे पाऊल उचलत असल्याचे सरकारचे म्हणणे आहे. यामुळे पालकांना आपल्या मुलीमुळे सन्मान मिळत असल्याची भावना निर्माण होईल, असा यामागील विचार आहे.

हरयाणातील १२ जिल्हे 'बेटी बचाव, बेटी पढाओ' योजनेत सामाविष्ट आहेत. स्त्री भ्रूणहत्येस आळा घालण्यासाठी हरयाणा सरकार गेले काही महिने याबाबत पाऊले उचलत आहे.