मोदीजी तुम्हाला लाज वाटायला हवी - मल्लिका साराभाई

डान्सर-राजनेता मल्लिका साराभाई यांनी आपली आई मृणालिनी साराभाई यांच्या निधनानंतर सोशल वेबसाईटवर केलेल्या एका वाद उभा राहिलाय. 'मोदीजी तुम्हाला लाज वाटायला हवी' या शब्दांत मल्लिका यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केलीय. 

Updated: Jan 22, 2016, 04:04 PM IST
मोदीजी तुम्हाला लाज वाटायला हवी - मल्लिका साराभाई title=

गांधीनगर : डान्सर-राजनेता मल्लिका साराभाई यांनी आपली आई मृणालिनी साराभाई यांच्या निधनानंतर सोशल वेबसाईटवर केलेल्या एका वाद उभा राहिलाय. 'मोदीजी तुम्हाला लाज वाटायला हवी' या शब्दांत मल्लिका यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केलीय. 

'प्रिय पंतप्रधान, तुम्ही माझ्या राजकारणाचा तिरस्कार करता आणि मी तुमच्या... पण, मृणालिनी साराभाई यांनी ६० वर्ष आपल्या देशाचा सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी काही केलंय असं तुम्हाला वाटत नाही का? त्यांनी आपली संस्कृती जगभरात पोहचवलीय. पण, त्यांच्या निधनावर एक शब्दही न उच्चारणं तुमची मानसिकता स्पष्ट करतो. तुम्ही माझा कितीही तिरस्कार करा, पण एक पंतप्रधान म्हणून तुम्ही त्यांच्या कामाला सन्मान द्यायलाच हवा... जे तुम्ही केलं नाहीत. तुम्हाला लाज वाटायला हवी' असं मल्लिकानं आपल्या फेसबुक पेजवर म्हटलंय. 
  

My dear prime ministerYou hate my politics and I hate yours.That has nothing to do with what Mrinalini Sarabhai did to...

Posted by Mallika Sarabhai on Thursday, January 21, 2016

गुरुवारी मृणालिनी साराभाई यांचं निधन झालं होतं. त्यानंतर मल्लिका यांनी ही पोस्ट आपल्या ट्विटर आणि फेसबुक अकाउंटवर टाकली होती. मल्लिकानं २००९ मध्ये गुजरातच्या गांधीनगर लालकृष्ण आडवाणी यांच्याविरुद्ध अपक्ष म्हणून निवडणूक लढली होती... परंतु, त्यांच्या पदरात पराभवच पडला.