www.24taas.com, झी मीडिया, कोलकाता
कोलकात्याच्या ऐतिहासिक ब्रिगेड मैदानावर आज नरेंद्र मोदींची सभा होतेय. ममता बॅनर्जी आणि कम्युनिस्टांचा बालेकिल्ला असलेल्या कोलकात्यात मोदींच्या सभेला काय प्रतिसाद मिळतो, याकडं आता सर्वाचं लक्ष लागलंय.
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी बुधवारी कोलकात्यात दाखल होतायत. ऐतिहासिक ब्रिगेड मैदानावर त्यांची जाहीर सभा होणार असून, सभेची जय्यत तयारी करण्यात आलीय. या सभेमध्ये सहभागी होण्यासाठी १०० रुपयांचं तिकीट ठेवण्यात आलंय. ३० जानेवारीला झालेला ममता बॅनर्जींचा भव्य मोर्चा आणि येत्या ८ फेब्रुवारीला होणारा डाव्या आघाडीचा मोर्चा, या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदींच्या सभेला महत्त्व आलंय.
कोलकात्यातील भाजपची ही रॅली ऐतिहासिक ठरणार आहे. केवळ कार्यकर्तेच नाहीत तर समाजातील विविध घटक रॅलीत सहभागी होणार आहेत, असा दावा भाजप नेते राहुल सिन्हा यांनी केलाय.
ममता बॅनर्जींच्या रॅलीला काही हजार लोक उपस्थित होते. परंतु, मोदींच्या रॅलीला लाखो लोक उपस्थित राहतील, असा अंदाज आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.