सपा आमदारांनी घरं खाली केल्यानंतर लागले 'मोदी मॅजिक'चे टाळे

उत्तर प्रदेश निवडणुकीमध्ये समाजवादी पक्षाचा मोठा पराभव झाला. २०१२ मध्ये सपाला २२४ जागा मिळाल्या होत्या. पण यंदा मात्र फक्त ४७ जागा मिळवत्या आल्या. निवडणुकीत पराभव  झालेल्या आमदारांना आता सरकारी घरं खाली करावी लागत आहेत. पण मजेशीर गोष्ट म्हणजे घरं खाली केल्यानंतर घराला मोदी मॅजिकचे टाळे लावण्यात आले.

Updated: Mar 17, 2017, 03:57 PM IST
सपा आमदारांनी घरं खाली केल्यानंतर लागले 'मोदी मॅजिक'चे टाळे  title=

लखनऊ : उत्तर प्रदेश निवडणुकीमध्ये समाजवादी पक्षाचा मोठा पराभव झाला. २०१२ मध्ये सपाला २२४ जागा मिळाल्या होत्या. पण यंदा मात्र फक्त ४७ जागा मिळवत्या आल्या. निवडणुकीत पराभव  झालेल्या आमदारांना आता सरकारी घरं खाली करावी लागत आहेत. पण मजेशीर गोष्ट म्हणजे घरं खाली केल्यानंतर घराला मोदी मॅजिकचे टाळे लावण्यात आले.

टाळ्यांवर मोदी मॅजिक असं लिहिण्यात आलं आहे. सपाचे माजी आमदार आणि अखिलेश सरकारमधील मंत्री रविदास मेहरोत्रा यांनी घर खाली केल्यानंतर त्यांच्या घराला असा टाळा लावण्यात आला आहे.

हे टाळे मुद्दामहून लावण्यात आले की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.