मोबाईल नंबर होणार ११ आकडी!

देशात मोबाईल धारकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. परिणामी मोबाईल नंबरचा कोटा संपत आला आहे. ९८ आणि ९९ यासारख्या सिरजचा तुटवडा पुढच्या वर्षांपासून निर्माण होण्याची शक्यता आहे, त्यामुळे आता दहा अंकी असलेला मोबाईल क्रमांक ११ आकडी होण्याची शक्यता आहे.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Oct 22, 2012, 06:09 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली
देशात मोबाईल धारकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. परिणामी मोबाईल नंबरचा कोटा संपत आला आहे. ९८ आणि ९९ यासारख्या सिरजचा तुटवडा पुढच्या वर्षांपासून निर्माण होण्याची शक्यता आहे, त्यामुळे आता दहा अंकी असलेला मोबाईल क्रमांक ११ आकडी होण्याची शक्यता आहे.
पुढच्या वर्षापर्यंत मोबाईल नंबरची संख्या ही एक अब्जाच्या पुढे जाणार आहे. सेल्युलर ऑपरेटर असोसिएशन ऑफ इंडियाचे (सीओएआय) संचालक राजन मॅथ्यूज म्हणाले, पुढील वर्षी नवीन नंबर सुरु केले गेले नाही तर, मोठी समस्या निर्माण होऊ शकते.
मोबाईल नंबर तुटवड्याच्या संकटावर उपाय शोधण्याचे काम सुरु झाले आहे. ११ किंवा १२ डिजीटचा नवा नंबर पुढील वर्षापासून सुरु केला जाण्याची शक्यता आहे. तसा एक प्रस्ताव टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडियाने (ट्राय) दुरसंचार विभागाला दिला आहे. मात्र दुरसंचार विभाग अन्य पर्यायांचाही शोध घेत आहे.