मोबाइल करतोय घोळ, मुली पळून जातात- खासदार राजपाल

मोबाइल आज खरी काळाची गरज झाली आहे. त्यामुळे मोबाइल दोन मिनिटे जरी हातात नसला की आपण लगेचच अस्वस्थ होतो.

Updated: Oct 23, 2012, 04:18 PM IST

www.24taas.com, मुजफ्फरनगर
मोबाइल आज खरी काळाची गरज झाली आहे. त्यामुळे मोबाइल दोन मिनिटे जरी हातात नसला की आपण लगेचच अस्वस्थ होतो. पण तुम्हांला खरं वाटणार नाही. मोबाइलमुळे मुली घरातून पळून जात आहेत. त्यामुळे मुले व खासकरून मुलींना मोबाइल देऊ नयेत, असा सल्ला उत्तर प्रदेशातील मुजफ्फरपूरचे बसप खासदार राजपाल सैनी यांनी दिला.
पळून गेलेल्या बहिणीला शोधण्यात मदत करावी, अशा अपेक्षेने एक जण माझ्याकडे आला. मुलीला मोबाइल देऊ नको, असा सल्ला मी त्याला दिला, असे राजपाल म्हणाले. आजकाल जातो तेथे मी हेच सांगत असतो. मोबाइलमुळे मुलींचे लक्ष विचलित होते, असे व्हिडिओ फुटेजमध्ये राजपाल म्हणतात.
जुन्या काळात मोबाइल नव्हते, तेव्हा महिला जगल्या नाहीत काय, मुलींना मोबाइल कशाला पाहिजे, असे सवाल त्यांनी केले. वृत्तवाहिन्यांवर बातमी येताच राजपाल यांनी वक्तव्याचा विपर्यास केल्याचे म्हणत घूमजाव केले.