नवी दिल्ली : भारतीय मोबाईल उत्पादक कंपनी लवकरच तीन नव्या कंपन्या सुरु करत आहे. यासाठी पुढील काही महिन्यांत ३०० कोटी रुपयांची गुंतवणूक कऱणार आहे. राजस्थान, तेलंगणा आणि आंध्रप्रदेशात हे नवे कारखाने सुरु केले जाणार आहेत. पुढील वर्षात हे कारखाने सुरु होणार आहेत. त्यामुळे नवीन वर्षात तब्बल १० हजार ५०० जणांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे.
आम्ही तेलंगणामध्ये २० एकर जमीन घेतली आणि तेथे कारखान्याचे कामही सुरु झालेय. राजस्थानमध्येही २५ एकर जमीन घेतली असून तेथे लवकरच काम सुरु होणार आहे. तिरुपतीमध्येही लवकरच काम सुरु केले जाणार आहे, अशी माहिती मायक्रोमॅक्सचे सहसंस्थापक राजेश अग्रवाल यांनी दिली.
प्रत्येक कारखान्यात ३ हजार ते ३५०० लोकांना रोजगार दिला जाणार आहे. भारताला इलेक्ट्रॉनिक उत्पादक केंद्र बनवण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.