www.24taas.com, झी मीडिया, बंगळुरू
भारतानं आपलं यान मंगळावर धाडलं... या मोहिमेसाठी होणाऱ्या खर्चावर बरीच चर्चाही झाली. सध्या भारताला खरंच या मंगळ मोहिमेची गरज होती काय? असे प्रश्नही उपस्थित करण्यात आले होते... पण, तुम्हाला आश्चर्य वाटेल की, आपण रिक्षा आणि टॅक्सी प्रवासासाठी जेवढे पैसे मोजतो त्यापेक्षा कमी खर्चात मंगळयान प्रवास करतंय.
होय, आता तुम्ही म्हणाल कसं? तर… या मोहिमेवर एकूण खर्च झालाय ४५८ कोटी रुपये... आणि हे यान आता पृथ्वीपासून मंगळावर दाखल होण्यासाठी ५४.६ दशलक्ष किलोमीटरचा प्रवास करणार आहे... म्हणजे एका किलोमीटरसाठी हा खर्च येतोय निव्वळ १२ रुपये... आणि रिक्षाच्या एका किलोमीटरसाठी १५ रुपये तर टॅक्सीसाठी १९ रुपये आपण सध्या मोजतोय.
मग, आहे की नाही... रिक्षापेक्षा मंगळयानाच्या प्रवासाचा खर्च कमी...
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.