अजब-गजब : वय-६ वर्ष, उंची - ५ फूट ७ इंच

होय, मेरठमध्ये राहणाऱ्या एका सहा वर्षांच्या एका मुलाची उंची आहे पाच फूट सात इंच... या मुलाचं जेवणही एखाद्या वयस्क व्यक्तीप्रमाणे आहे. 

Updated: Sep 17, 2014, 12:29 PM IST
अजब-गजब : वय-६ वर्ष, उंची - ५ फूट ७ इंच  title=

मेरठ : होय, मेरठमध्ये राहणाऱ्या एका सहा वर्षांच्या एका मुलाची उंची आहे पाच फूट सात इंच... या मुलाचं जेवणही एखाद्या वयस्क व्यक्तीप्रमाणे आहे. 

करण असं या सहा वर्षीय मुलाचं नाव... या मुलाची आई श्वेतलाना ही भारतीय बास्केटबॉल टीमची खेळाडू आहे आणि तीही आपल्या उंचीमुळे चर्चेत असते. श्वेतलानाची उंची हे ७ फूट ३ इंच... 

सहा वर्षांपूर्वी श्वेतलाना हिला मुलगा झाला. जन्माच्या वेळी करणची उंची सामान्य बालकाप्रमाणेच होती... पण तो जसंजसा मोठा होत गेला तसतशी त्याची उंची त्याच्या वयाच्या अनुमानापेक्षा मोठ्या फरकानं वाढत गेली. आज करणची उंची ५ फूट ७ इंच आहे... करणच्या वडिलांची उंची आहे ६ फूट ६ इंच...


करण १० महिन्यांचा असताना - ३ फूट २ इंच

आपल्या वयोमानानुसार, करण हा जगातील सर्वात उंच मुलगा असल्याचं मानलं जातंय. करण आत्ता दुसऱ्या इयत्तेत शिकतोय. साहजिकच, आपल्या वर्गात सगळ्यात उंच मुलगा ठरतोय. त्यामुळे, अनेकदा त्याच्या वर्गातील मुलं त्याच्यासोबत न खेळता घाबरून पळून जातात. 

करणलाही आपल्या आईप्रमाणे बास्केटबॉलची आवड आहे. तो आईसोबत बास्केटबॉलही खेळतो. करणची आई त्याच्या डाएटमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन आणि मिनरल्स राहील याची काळजी घेते. करणला मोठं होऊन इंजिनिअर बनायचंय.   

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.