नवी दिल्ली : खगोलशास्त्राच्या दुष्टीनं अत्यंत महत्त्वाची आणि दुर्मिळ घटना आज घडणार आहे. ही घटना म्हणजे बुध ग्रहाचं अधिक्रमण. बुध ग्रहाचा सुर्याच्या बिंबावरुन होणरा प्रवास संध्याकाळी पाचच्या सुमारास संपूर्ण भारतीयांना पहाता येणार आहे.
सूर्य, बूध आणि पृथ्वी हे सरळ रेषेत आल्यामुळे बुध ग्रहाचा सुर्यबिंबावरून होणारा प्रवास पहाता येणार आहे. बुध आणि शुक्र हे सूर्यमालेतील अंतर्ग्रह असल्याने यांचंच अधिक्रमण पहाता येतं. इतर वेळी हे ग्रह संध्याकाळी किंवा पहाटेच्या वेळी आकाशात दुर्बिणीने पहाता येतात. मात्र त्यांचा पूर्ण गोल आकार यावेळी कळत नाही. अधिक्रमणाच्या काळात हे ग्रह गोल असल्याचे स्पष्ट जाणवते.
बुध अधिक्रमणाच्या काळात बुध ग्रहाचा काळा ठिपका सुर्यबिंबावरून सरकताना दिसू शकेल.. मुंबई करांना संध्याकाळी 4 वाजून 40 मिनिटांनी हे दृश्य पहाता यईल पुढील दोन तीन मिनिटांत बुधाचा पूर्ण काळा ठिपका सुर्यबिंबावर पहाता येईल.. तब्बल दोन तासांहूव अधिक काळ ही खगोलीय घटना सुरु असेल.
या नंतर ही घटना थेट 2032 सालीच अनुभवता येणार आहे. त्यामुळे ही पर्वणी सोडू नका असं आवाहन खगोलशास्त्रज्ञांनी केलंय. मात्र नुसत्या डोळ्यांनी हे दृश्य पाहू नका असा इशारा खगोल शास्त्रज्ञांनी दिलाय. दुर्बिणीतून हे दृश्य पहातानाही विषिष्ट प्रकारचे फिल्टर लाऊनच ते पहावे लागणार आहे. नुसत्या डोळ्यांनी किंवा दुर्बिणीला फिल्टर न लावता हे दृश्य पाहिल्यास डोळ्यांना गंभीर इजा होण्याची शक्यता असल्यानं तज्ज्ञांच्या मदतीनंच हे दृश्य पहाणं योग्य ठरेल.