झोपडपट्टीत राहणारा एका रात्रीत झाला करोडपती

नोटबंदीने लोकांना पैसे काढतांना त्रास सहन करावा लागतोय. पण अनेक जणांकडून या निर्णयाचं स्वागत देखील होत आहे. त्यामुळे थोडा सहन त्रास सहन करावा लागत असला तर या निर्णयाशी अनेक जण सहमत आहेत. तर दुसरीकडे एका झोपडीत राहणारा व्यक्ती एका रात्रीत करोडपती झाला आहे.

Updated: Dec 8, 2016, 08:37 AM IST
झोपडपट्टीत राहणारा एका रात्रीत झाला करोडपती title=

नवी दिल्ली : नोटबंदीने लोकांना पैसे काढतांना त्रास सहन करावा लागतोय. पण अनेक जणांकडून या निर्णयाचं स्वागत देखील होत आहे. त्यामुळे थोडा सहन त्रास सहन करावा लागत असला तर या निर्णयाशी अनेक जण सहमत आहेत. तर दुसरीकडे एका झोपडीत राहणारा व्यक्ती एका रात्रीत करोडपती झाला आहे.

दिल्लीतील आयटीओमधील झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या रामचरण यांची झोप उडाली जेव्हा त्यांच्या अकाऊंटमध्ये 40 कोटी जमा झाले आणि त्यांच्या घरी इडीचे अधिकारी चौकशीसाठी पोहोचले. रामचरण हे पेंटर आहेत पण पोलिसांनी त्यांना सांगितलं की तुम्ही एका कंपनीचे डायरेक्टर आहात आणि 40 कोटींचे मालक आहात.

रामचरण यांचं वोटर आयडी आणि पॅनकार्डचा वापर करुन त्याचं एक्सिस बँकेमध्ये अकाऊंट उघडण्यात आलं. पण रामचरण यांचं हे अकाऊंट कोणी उघडलं या बाबत त्यांना काहीही माहित नाही. या प्रकरणात बँक मॅनेजरची चौकशी होत आहे.