जम्मू : पिपल्स डेमोक्रॅटिक पार्टीच्या अध्यक्षा आणि जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार म्हणून मेहबुबा मुफ्ती यांची बिनविरोध निवड करण्यात आलीय.
पीडीपीच्या सर्व आमदार आणि खासदारांच्या काल झालेल्या बैठकीत हा निर्णय घेतला गेला. पक्षाचे ज्येष्ठ नेते मुझफ्फर हुसेन बेग यांनी ही माहिती दिली. आज भाजपकडून पाठिंब्याचं पत्र पीडीपीला सादर केलं जाईल.
या पत्रानंतर मेहबुबा जम्मू काश्मिरच्या राज्यपालांना भेटून सरकार स्थापनेचा दावा करतील. अशाप्रकारे मेहबुबा जम्मू कश्मीर राज्याच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होतील.