उत्तरप्रदेश : एखाद्या सिनेमाच्या कथेला शोभून दिसेल अशी एक घटना उत्तरप्रदेशातल्या मेरठमध्ये समोर आलीय. पत्नीच्या खुनाची शिक्षा भोगणाऱ्या पतीनं कोणताही गुन्हा केला नाही, हे तब्बल दीड वर्षांनी उघड झालं... आणि तेही मृत समजली गेलेली पत्नी समोर आल्यानंतर...
पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शामली गावातील रहिवासी बागजहा हिचा निकाल 14 वर्षांपूर्वी मेरठ जिल्ह्यातील भैसा नावाच्या गावात राहणाऱ्या इश्त्याकसोबत झाला होता. जवळपास दोन वर्षांपूर्वी बागजहां अचानक गायब झाली. त्यानंतर, तिचा भाऊ नफीसनं गेल्या वर्षी 13 मे रोजी आपल्या बहिणीचं अपहरण झाल्याची तक्रीर पोलिसांत दाखल केली होती.
या प्रकरणात पोलिसांनी बागजहा हिचा पती इश्त्याक, तिचा दीर दीनी, अश्फाक आणि हफीज अशा चार जणांना अटक केली होती. जवळपास आठ महिन्यांपूर्वी पोलिसांनी किठौरच्या रजवाहेमध्ये एका महिलेचं मृत सडलेलं शरीरही सापडलं होतं. ते बागजहां हिचंच शव असल्याचं समजून पोलिसांनी आरोपींना तुरुंगातही धाडलं होतं.
बागजहा हत्या प्रकरणात ट्विस्ट
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाचा छडा लागला असं वाटत असतानाच त्याला एक वेगळंच वळण मिळालं. मंगळवारी, 29 जुलै रोजी ईदच्या दिवशी बागजहा हिच्या सासरच्या एका ग्रामस्थानं तिला मेरठच्या कोतवाली क्षेत्रातील एका अज्ञात व्यक्तीसोबत पाहिलं. त्यानंतर बागजहा जिवंत असल्याचं समोर आलं.
त्यानंतर बागजहाचे सासरचे मंडळी पोलीस स्टेशनमध्ये पोहचले. बागजहा जिवंत असल्याचं पोलिसांना सांगितल्यानंतर पोलिसांचं एक दलानं लगेचच कोतवालीकडे धाव घेतली. इथं बागजहासोबत तिचा प्रियकर फजरू यालाही ताब्यात घेण्यात आलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.