www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
अण्णांची टीम सोडून मेधा पाटकर आता आम आदमी पार्टीत सामिल होणार आहेत, बड्या पदावर असलेल्या लोकांमध्येही आम आदमी पक्षात सामिल होण्याची चढाओढ लागली आहे. आप मेधा पाटकर यांच्या संपर्कात असल्याचं सांगण्यात येत आहे.
मेधा पाटकर या आपमध्ये येण्यास सकारात्मक आहेत, असा दावा आपने केला आहे. मेधा पाटकर यांनी यापूर्वी अण्णा हजारे यांच्यासोबत आंदोलनात भाग घेतला आहे. नमर्दा बचाओ आंदोलनातही मेधा पाटकर यांचा सक्रीय सहभाग आहे.
`आप`ला मेधा पाटकर यांचा दक्षिण गुजरात, उत्तर महाराष्ट्रात बऱ्यापैकी फायदा होऊ शकतो. यावर मेधा पाटकर यांना विचारले असता, आम आदमी पक्षात जाण्याविषयी पक्षाशी चर्चा झाली आहे. पण अजुनही आपण यावर काहीही निर्णय घेतलेला नाही.
इन्फोसिसमधून राजीनामा देऊन कॉर्पोरेट जगताला धक्का देऊन वी बालकृष्णन आम आदमी पार्टीत सहभागी झाले आहेत. मी आपमध्ये सामील झाल्याचं बालकृष्णन यांनी राजीनामा दिल्यानंतर तीन आठवड्यांनी जाहीर केलं होतं. वी बालकृष्णन यांनी २० डिसेंबरपासून कंपनीच्या व्यवस्थापन समितीतून राजीनामा दिला होता.
आपने देशात क्रांती आणली आहे आणि मी त्याबद्दल खूप उत्साही असल्याचंही मेधा पाटकर यांनी म्हटलं आहे. प्रसिद्ध नृत्यांगणा मल्लिका साराभाई आपमध्ये सामिल आहेत.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.