काँग्रेसला तोंड दाखवायलाही जागा ठेवणार नाही - अरुण जेटली

काळ्या पैशांच्या मुद्द्यावरून टीका झाल्यानंतर अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज काँग्रेसवर हल्लाबोल केलाय. परदेशी बँकांमध्ये काळं धन ठेवणाऱ्या लोकांच्या नावाचा खुलासा होईल तेव्हा काँग्रेसला तोंड दाखवायलाही जागा उरणार नाही, असं अरुण जेटली यांनी म्हटलंय. 

Updated: Oct 21, 2014, 08:14 PM IST
काँग्रेसला तोंड दाखवायलाही जागा ठेवणार नाही - अरुण जेटली title=

नवी दिल्ली : काळ्या पैशांच्या मुद्द्यावरून टीका झाल्यानंतर अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज काँग्रेसवर हल्लाबोल केलाय. परदेशी बँकांमध्ये काळं धन ठेवणाऱ्या लोकांच्या नावाचा खुलासा होईल तेव्हा काँग्रेसला तोंड दाखवायलाही जागा उरणार नाही, असं अरुण जेटली यांनी म्हटलंय. 

आपण, लवकरच काळं धन ठेवणाऱ्या खातेधारकांची नाव सार्वजनिक करणार आहोत, असंही जेटली यांनी म्हटलंय. 'मी तुम्हाला आश्वासन देतो, की ज्यावेळी ही नावं समोर येतील तेव्हा मी आणि भाजपला नाही, पण काँग्रेसला तोंड दाखवायलाही जागा उतरणार नाही' असं जेटली यांनी म्हटलंय. भारतीय अधिकाऱ्यांनी ज्या खातेधारकांविरोधात आरोपपत्र दाखल केलंय त्यांच्या नावांचा खुलासा लवकरच न्यायालयात करण्यात येईल. 

काँग्रेसनं भाजपवर काळ्या पैशांच्या खातेधारकांच्या नावांचा खुलासा करण्यात अपयशी ठरल्याचा आरोप करत भाजप ढोंग करत असल्यांचं म्हटलंय. 

मीडियाचा म्हणणं आहे की भाजप सरकार काळ्या पैशांच्या खातेदारकांची नावं उघड करत नाही... पण, आम्ही कायद्याच्या चौकटीत राहून या नावांचा खुलासा करणार असल्याचंही जेटलींनी म्हटलंय.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.