'सेस'मुळे मारुतीच्या किंमतीत भरमसाठ वाढ...

देशातील सर्वात मोठी कार कंपनी असलेल्या 'मारुती सुझुकी'नं आपल्या कारच्या किंमतीत जवळवास ३४,४९४ रुपयांपर्यंत वाढ केलीय. 

Updated: Mar 3, 2016, 04:17 PM IST
'सेस'मुळे मारुतीच्या किंमतीत भरमसाठ वाढ...  title=

नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी कार कंपनी असलेल्या 'मारुती सुझुकी'नं आपल्या कारच्या किंमतीत जवळवास ३४,४९४ रुपयांपर्यंत वाढ केलीय. 

अर्थसंकल्प २०१६-१७ मध्ये जाहीर करण्यात आलेल्या 'सेस'च्या भरपाईसाठी कंपनीनं हा निर्णय घेतलाय.

केंद्रीय सरकारनं पायाभूत सुविधांसाठी 'सेस' लावण्याचा घेतलेल्या निर्णयामुळे मारुतीनं आपल्या वेगवेगळ्या किंमतींच्या मॉडल्सच्या गाड्यांवर १४४१ रुपयांपासून ३४,४९४ रुपयांपर्यंत वाढ केलीय. 

केवळ सियाज एचएसव्हीएस आणि अर्टिगा एसएचव्हीएस या मॉडल्सला सेसपासून सुटका मिळणार आहे. या गाड्यांची किंमत 'जैसे थे' ठेवण्यात आलीय. मारुतीच्या विविध गाड्यांच्या किंमतीची सुरुवात २.५४ लाखांपासून ते ११.६९ लाख रुपयांपर्यंत आहे.

सरकारनं बजेट २०१६-१७मध्ये डिझेल गाड्यांवर सेस लावण्याचा निर्णय घेतलाय. चार मीटर लांब आणि इंजिन क्षमता  १५०० सीसी पर्यंत असणाऱ्या गाड्यांसाठी २.५ टक्के सेस असेल तर यापेक्षा जास्त क्षमतेच्या इंजिन, एसयूव्ही आणि मोठ्या सिडानवर कारच्या किंमतीच्या ४ टक्के सेस लावण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आलाय.