दिल्ली विमानतळावर भारतीय महिलेशी वर्णभेदी टिप्पणी

दिल्ली एअरपोर्टवर एका मणिपूरी महिलेशी वर्णभेदी टिप्पणी करण्यात आली आहे.

Updated: Jul 11, 2016, 10:52 PM IST
दिल्ली विमानतळावर भारतीय महिलेशी वर्णभेदी टिप्पणी title=

दिल्ली : दिल्ली एअरपोर्टवर एका मणिपूरी महिलेशी वर्णभेदी टिप्पणी करण्यात आली आहे. दिल्लीच्या इंदिरा गांधी इंटरनेशनल एयरपोर्टवरची ही घटना आहे. मणिपूरची मोनिका सिओलला जात होती, त्यावेळी तिचा पासपोर्ट तपासणा-या अधिका-यानं वर्णभेदी टिप्पणी करत तिचा अपमान केला. तू भारतीय वाटत नाहीस, खरंच भारतीय आहेस का, असे सवाल तिला वारंवार करण्यात आले. 

यासंदर्भात अनेकांनी ट्विट करुन परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्याकडे कारवाईची मागणी केली. याबाबत सुषमा स्वराज यांनी ट्विट करून मोनिकाची माफी मागितली आहे. तसंच हे माझ्या खात्यात येत नाही तरी मी घडलेल्या प्रकाराची माहिती गृहमंत्री राजनाथ सिंग यांना देईन असंही सुषमा स्वराज म्हणाल्या आहेत. 

 

 

ही आहे मोनिकाची फेसबुक पोस्ट