दाऊदची कार जाळणाऱ्याला अंडरवर्ल्डकडून धमक्या

दिल्लीनजिक असलेल्या उत्तरप्रदेशातील गाझियाबादमध्ये राहणाऱ्या स्वामी चक्रपाणी महाराज यांनी आपल्याला अंडरवर्ल्डकडून धमक्या मिळत असल्याचं म्हटलंय. 

Updated: Jan 1, 2016, 01:15 PM IST
दाऊदची कार जाळणाऱ्याला अंडरवर्ल्डकडून धमक्या title=

गाझियाबाद : दिल्लीनजिक असलेल्या उत्तरप्रदेशातील गाझियाबादमध्ये राहणाऱ्या स्वामी चक्रपाणी महाराज यांनी आपल्याला अंडरवर्ल्डकडून धमक्या मिळत असल्याचं म्हटलंय. 

लिलावात दाऊदची गाडी विकत घेऊन ती विकल्यानंतर नुकतेच स्वामी चक्रपाणी प्रकाशझोतात आले होते. अखिल भारत हिंदू महासभेशी जोडल्याचा दावा करणाऱ्या स्वामी चक्रपाणी यांच्या म्हणण्यानुसार, त्यांना एक एक टेलीफो कॉल आणि दोन अज्ञात क्रमांकांवरून काही मोबाईल संदेश मिळालेत. 

आपल्याही कारप्रमाणेच जाळण्यात येईल, अशी धमकी मिळाल्याचं त्यांनी म्हटलंय. ९ डिसेंबर २०१५ रोजी झालेल्या लिलावात त्यांनी ३२,००० रुपयांना दाऊदची कार विकत घेतली होती.... आणि त्यानंतर त्या गाडीला पेटवून दिलं होतं. 

याबद्दल आपण गृहमंत्री राजनाथ सिंह यांचीही भेट घेतल्याचं चक्रपाणी यांनी म्हटलंय. आपल्याला झेड श्रेणीची सुरक्षा पुरवण्याचं राजनाथ सिंह यांनी म्हटलं पण, आपण काही नेता नाही त्यामुळे कोणतीही सुरक्षा घेण्यास आपण नकार दिल्याचंही ते सांगतात.