संसदेच्या कँटीनमध्ये सबसिडी बंद

संसदेच्या कँटीनमध्ये मिळणाऱ्या पदार्थांच्या किंमतीत शुक्रवारपासून वाढ होतेय. त्यामुळे आता १८ रुपयांत मिळणारी व्हेज थाळी ३० रुपयांत मिळणार आहे. तर ३३ रुपयांमध्ये आधी नॉनव्हेज थाळी मिळत होती. या थाळीची किंमत ६० रुपये करण्यात आलीय. २९ रुपयांची चिकन करी ४० रुपयांत मिळणार आहे. यापूर्वी थ्री कोर्स मील ६१ रुपयांना मिळत होते. हे जेवण आता ९० रुपयांना उपलब्ध होणार आहे. 

Updated: Jan 1, 2016, 11:40 AM IST
संसदेच्या कँटीनमध्ये सबसिडी बंद title=

नवी दिल्ली : संसदेच्या कँटीनमध्ये मिळणाऱ्या पदार्थांच्या किंमतीत शुक्रवारपासून वाढ होतेय. त्यामुळे आता १८ रुपयांत मिळणारी व्हेज थाळी ३० रुपयांत मिळणार आहे. तर ३३ रुपयांमध्ये आधी नॉनव्हेज थाळी मिळत होती. या थाळीची किंमत ६० रुपये करण्यात आलीय. २९ रुपयांची चिकन करी ४० रुपयांत मिळणार आहे. यापूर्वी थ्री कोर्स मील ६१ रुपयांना मिळत होते. हे जेवण आता ९० रुपयांना उपलब्ध होणार आहे. 

लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी किंमतीमध्ये बदल करण्याचे आदेश दिलेत. सहा वर्षानंतर या किंमतींमध्ये बदल करण्यात आलेत आणि वेळोवेळी यात गरजेनुसार बदल केले जातील. 

बाजारातील दिवसेंदिवस वाढत जाणारी महागाई पाहता संसदेच्या कँटीनमधील जेवणावर दिल्या जाणाऱ्या सबसिडीवरुन वाद निर्माण झाले होते. त्यानंतर या किंमती वाढवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. 

संसदेच्या कँटीनमध्ये मिळणाऱ्या जेवणांच्या किंमतीवरुन मीडियात चर्चा झाली होती. त्यानंतर महाजन यांनी खाद्य समितीला याबाबत लक्ष देण्यास सांगितले होते.