नवी दिल्ली : पठाणकोटच्या एअरबेसवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात एनएसजीचे कमांडो लेफ्टनंट कर्नल निरंजन कुमार यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या इसमाला अटक करण्यात आलीये.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या आरोपीला देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक कऱण्यात आलीये. चांगले झाले. आणखी एक समस्या कमी झाली. आता त्यांच्या पत्नीला आर्थिक मदत आणि नोकरी मिळेल. सामान्य माणसाला काही मिळत नाही. लोकशाही वाईट आहे, असं त्यानं पोस्टवर म्हटलंय.
मल्लपुरममध्ये राहणाऱ्या २४ वर्षीय आरोपी अन्वरनेही केलेली पोस्ट वायरल झाली होती. यावर मोठ्या प्रमाणात टीकाही झाली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आरोपीला घरातून अटक केली. त्याच्याविरोधात भारतीय दंड विधानानुसार कलम १२४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याक आलाय. दरम्यान, ही पोस्ट डिलीट करण्यात आली असून याबाबतचा अधिक तपास सुरु आहे.
पठाणकोट दहशतवादी हल्ल्यादरम्यान बॉम्ब निकामी करताना कर्नल निरंजन कुमार शहीद झाले होते.