नवी दिल्ली : केंद्रातील संरक्षणमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता मनोहर पर्रिकर गोव्याच्या मुख्यमंत्री विराजमान होतील. त्यांच्या संरक्षणमंत्री पदाचा भार तात्पुरता अरूण जेटली यांच्याकडे दिला असला तरी तो मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याकडे काही काळाने सोपविण्यात येईल असे वृत्त समोर येत आहे.
हिंदी वृत्तपत्र दैनिक भास्कर यांनी दिलेल्या वृत्तानुसार पर्रिकरांची जागा शिवराजसिंह चौहान यांना संरक्षणमंत्री पद मिळणार आहे. गोव्यात पेच निर्माण झाल्याने पर्रिकरांना गोव्यात जावे लागले.
शिवराजसिंह चौहान यांना संरक्षणमंत्री पद देण्याबाबत पक्ष गंभीर असल्याचे समजते.