पणजी: लुईस बर्जर भ्रष्टाचार प्रकरणी गोव्याचे तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री चर्चिल आलेमाव यांना गोवा पोलिसांच्या गुन्हे शाखेनं अटक केलीय. काल रात्री साडे दहाच्या सुमारास आलेमाव यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.
आज त्यांना कोर्टात हजर करून त्यांची पोलीस कोठडी मागितली जाईल. 2010 गोव्यातल्या पाणी प्रकल्पाचं काम मिळावं यासाठी अमेरिकेतल्या लुईस बर्गर या कंपनीकडून आलेमाव यांनी लाच घेतल्याचं अमेरिकन न्यायालयात सिद्ध झालंय.
या प्रकरणात माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांचंही नाव जोडलं गेलं आहे. मात्र दिगंबर कामत यांनी बुधवारीच न्यायालयाकडून अंतरिम जामीन मिळवला आहे. तर याच प्रकरणी लुईस बर्जर कंपनीचे भारताचे प्रमुख सत्यकाम मोहंती आणि या प्रकल्पाचे संचालक आनंद वाचासुंदर यांना आधीच अटक झालेली आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.