सोनिया, राहुलप्रमाणे आमचा पक्ष चालवू - राबड़ीदेवी

ज्याप्रमाणे सोनिया आणि राहुल गांधी काँग्रेस पक्ष चालवत आहेत, त्याचप्रमाणे मी आणि माझा मुलगा तेजस्वी आम्ही दोघं राष्ट्रीय जनता दल पक्ष पुढे चालवू.

Updated: Oct 1, 2013, 05:48 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, पाटणा
ज्याप्रमाणे सोनिया आणि राहुल गांधी काँग्रेस पक्ष चालवत आहेत, त्याचप्रमाणे मी आणि माझा मुलगा तेजस्वी आम्ही दोघं राष्ट्रीय जनता दल पक्ष पुढे चालवू.
चारा घोटाळ्यात दोषी आढळल्याने राजद प्रमुख लालूप्रसाद यादव यांना चार वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आल्याने त्यांना जेलची हवा खावी लागणार आहे. ते जेलमध्ये गेल्यानंतर त्यांची पत्नी आणि बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबड़ीदेवी यांनी राजद या राजकीय पक्षाच्या भवितव्यावर भाष्य केलं.
सीबीआयच्या रांची कोर्टाच्या निकालावर राबडीदेवींनी स्पष्टीकरण दिलंय. रांची न्यायालयाच्या निर्णयाचा पक्षावर काय परिणाम होईल, असे विचारल्यावर राबड़ीदेवींनी सांगितलं, लालूप्रसाद यांच्या गैरहजेरीत आमचा मुलगा तेजस्वी राजदचा गाडा पुढे हाकेल. त्यांनी (लालूप्रसाद) पक्ष उभा केला आहे.
काँग्रेस पक्षाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सोनिया, राहुल यांनी पुढाकार घेतला. त्याचप्रमाणे आम्ही राजदला मजबूत बनवण्याचे काम करू. त्यांच्या या स्पष्टी करणामुळे राजदमधील चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.
तेजस्वी यादव यांनी रांचीमध्ये पत्रकारांना सांगितंल, आम्ही हायकोर्टात अपिल करू. आमचा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. हे विरोधकांचे षडयंत्र आहे. आम्ही जनतेच्या न्यायालयात याचा निर्णय घेऊ. ज्यांनी आमच्या नेत्याला यात गोवले आहे, त्यांना लोकसभा निवडणुकांमध्ये याचे उत्तर देऊ.
राबड़ीदेवींनी म्हटलंय की त्यांचे पती हे एका षडयंत्राचे शिकार आहेत. त्यांनी षडयंत्रकर्त्याची नावे सांगण्यास मात्र नकार दिला. त्यांनी आरोप केला की, नीतिशकुमार आणि शिवानंद तिवारींसारखे भ्रष्ट नेते सत्तेत आहेत.
१९९६ मध्ये चारा घोटाळा उघडकीला आला तेव्हा राबड़ीदेवींची पक्षाला मदत झाली होती. सीबीआय तपासाची मागणी आल्याने लालूप्रसाद यादव यांनी २५ जुलाई १९९७ ला मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. आणि पत्नीला मुख्यमंत्री केलं होत. राबड़ींनी १९९९ मध्ये पुन्हा मुख्यमंत्री होत्या. २००० ते २००५पर्यंत त्या मुख्यमंत्री होत्या.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.