मुंबई : टाटा समूहाच्या अध्यक्षपदावरून उचलबांगडी झाल्यानंतर सायरस मिस्त्री आणि रतन टाटा यांच्यात आता कायदेशीर लढाई सुरू झाली आहे. दोघांनीही परस्परांविरोधात राष्ट्रीय कंपनी कायदा लवादाकडे धाव घेतलीये.मिस्त्री यांनी लवादाकडे चार याचिका केल्यात. यातल्या तीन त्यांनी स्वतः रतन टाटा, टाटा सन्स आणि सर दोराबजी ट्रस्ट यांच्याविरोधात आहेत, तर सायरस इन्व्हेस्टमेंट्स प्रायव्हेट लिमिटेडच्या नावानं कॅव्हिट दाखल केली आहे.
दुसरीकडे त्यानुसार सायरस मिस्त्रींच्या याचिकेवर एकतर्फी आदेश दिला जाऊ नये, यासाठी टाटा समूहानंही सुप्रीम कोर्ट, मुंबई हायकोर्ट आणि कंपनी कायदा लवादामध्ये कॅव्हीट दाखल केली आहे. त्यामुळे आता टाटांचं म्हणणं कोर्ट आणि लवादाला ऐकून घ्यावं लागेल.