वकिलांनी संप करू नये : सर्वोच्च न्यायालय

वकिलांनी संप करू नये किंवा न्यायालयाच्या कामकाजावर बहिष्कार टाकण्यासारखी आंदोलने करू नयेत, असा आदेश आज सर्वोच्च न्यायालयाने दिला. 

Updated: Nov 28, 2015, 07:03 PM IST
वकिलांनी संप करू नये : सर्वोच्च न्यायालय title=

नवी दिल्ली : वकिलांनी संप करू नये किंवा न्यायालयाच्या कामकाजावर बहिष्कार टाकण्यासारखी आंदोलने करू नयेत, असा आदेश आज सर्वोच्च न्यायालयाने दिला. 

विविध प्रश्‍न सोडविण्यासाठी वकिलांच्या संघटनांनी बैठक बोलवावी आणि त्यात सर्व प्रश्‍न निकाली काढावेत, असेही न्यायालयाने सांगितले. संप हे ब्रम्हास्त्र आहे त्यामुळे त्याचा वापर अतिशय कमी वेळा करणं अपेक्षीत आहे मात्र हल्ली त्याचा सर्रास उपयोग होताना दिसतो असं मत न्यायमूर्ती कुरियन जोसेफ आणि अरुम मिश्रा यांच्या खंडपीठानं नोंदवलंय.

वकिलांना संप करण्यास मनाई करणारा आदेश सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने दिला होता, याचाही उल्लेख खंडपीठाने यावेळी केला. हा अतिशय गंभीर प्रश्‍न असून, त्यावर अभ्यास करणे गरजेचे असल्याचे ही खंडपीठाने नमूद केले आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.