फक्त 2 मुलांना जन्म देण्याचा कायदा बनवा : तोगडीया

सरकारने फक्त दोन मुलांना जन्म देण्याचा कायदा बनवला पाहिजे असे मत विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष प्रवीण तोगडीया यांनी व्यक्त केलंय

Updated: Jan 14, 2015, 11:57 AM IST
फक्त 2 मुलांना जन्म देण्याचा कायदा बनवा : तोगडीया title=

बरेली : सरकारने फक्त दोन मुलांना जन्म देण्याचा कायदा बनवला पाहिजे असे मत विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष प्रवीण तोगडीया यांनी व्यक्त केलंय

देशात अल्पसंख्यांकांची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. हा मुद्दा पुढे आणला की, त्यावर वादविवाद सुरू होतात. त्यामुळे सरकारने फक्त 2 मुलांना जन्माला घालण्याचा कायदा बनविला पाहिजे, असं प्रवीण तोगडीया यांनी म्हटलंय.

विहिंप आणि भाजपच्या नेत्यांकडून काही दिवसांपासून मुलांना जन्माला घालण्यावरून विविध वक्तव्ये करण्यात येत आहे. 

नुकतेच भाजप खासदार साक्षी महाराज आणि विहिंप नेत्या साध्वी प्राची यांनी प्रत्येक हिंदू कुटुंबाने चार आपत्यांना जन्माला घातले पाहिजे, असे म्हटल्याने वादंग निर्माण झालं होतं.

आता प्रवीण तोगडीया यांनी प्रत्येक कुटुंबाने दोनच मुलांना जन्म घालण्याचा कायदा करण्याची मागणी केली आहे. यामुळे हिंदू धर्मीयांची संख्या वाढेल, असं प्रवीण तोगडीया यांना म्हणायचंय.

तोगडीया म्हणाले, की असा कायदा केल्यास देशात हिंदू धर्मीयांची संख्या वाढेल. त्यानंतरच आपण कंदाहार, लाहौर आणि ढाकामध्ये भगवा फडकवू शकू. 

हिंदू धर्मीयांनी धर्मांतर सहन केले आहे. त्यामुळे धर्मांतराचे दुःख हिंदूंपेक्षा अन्य कोणी समजू शकत नाही. 

अयोध्येत हिंदू समाजाच्या मनानुसार राममंदिर उभारल्यानंतच विहिंपकडून मोठ उत्सव साजरा करण्यात येईल, असंही यावेळी तोगडीया यांनी सांगितलं.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.