२४ तासात ३ बलात्कार, मुलांकडे तुम्हीच लक्ष द्या- पोलीस

माणुसकीला काळिमा फासणाऱ्या घटना हरियाणातील रोहतकमध्ये घडली आहे. गेल्या २४ तासामध्ये तीन बलात्काराच्या घटना पोलिसात दाखल करण्यात आल्या आहेत.

Updated: Oct 4, 2012, 06:29 PM IST

www.24taas.com, चंदीगढ
माणुसकीला काळिमा फासणाऱ्या घटना हरियाणातील रोहतकमध्ये घडली आहे. गेल्या २४ तासामध्ये तीन बलात्काराच्या घटना पोलिसात दाखल करण्यात आल्या आहेत. राज्यात गेल्या महिन्यापासून आतापर्यंत बलात्काराची ही नववी घटना आहे.
सहावीत शिकणाऱ्या एका नाबालिक मुलीवर बलात्कार करण्यात आल्याचे समजते. आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. तर दुसरीकडे एका महिलेसोबत गॅंगरेप करण्यात आला आहे. पोलीस तक्रार दाखल केल्यानंतर पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर तिसऱ्या केसमध्ये एका तरूणीवर तिच्या घरातच जबरदस्ती करून बलात्कार करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. एका युवकावर आरोप ठेवण्यात आला आहे, सध्या तो फरार असल्याचे समजते.
मात्र हरियाणाचे डीजीपी रंजीव दलाल यांचा दावा आहे की, राज्यात सध्या बलात्काराच्या घटना कमी झाल्या आहेत. त्यांचे असेही म्हणणे आहे की, आई-वडिलांनी आपल्या मुलांकडे लक्ष ठेवावे जेणेकरू ते अशा हरकती करणार नाहीत.