जेव्हा लालू माजी महिला मुख्यमंत्र्यांना गुलाब देतात...

हृद्याशी संबंधित शस्त्रक्रियेनंतर चार महिने आराम ठोकल्यानंतर आता लालुंच्या चेहऱ्यावर भलताच उत्साह दिसून येतोय. पाटण्याला परतलेल्या आजेडी सुप्रीमो लालूप्रसाद यादव यांनी आपल्या निवासस्थानावर नव्या वर्षाचं मोठ्या धूमधडाक्यात स्वागत केलं.

Updated: Jan 1, 2015, 05:46 PM IST
जेव्हा लालू माजी महिला मुख्यमंत्र्यांना गुलाब देतात... title=

पाटणा : हृद्याशी संबंधित शस्त्रक्रियेनंतर चार महिने आराम ठोकल्यानंतर आता लालुंच्या चेहऱ्यावर भलताच उत्साह दिसून येतोय. पाटण्याला परतलेल्या आजेडी सुप्रीमो लालूप्रसाद यादव यांनी आपल्या निवासस्थानावर नव्या वर्षाचं मोठ्या धूमधडाक्यात स्वागत केलं.

या निमित्तानं लालुंनी रोमँन्टिक मूडमध्ये आपली पत्नी आणि बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडीदेवी यांना गुलाबाचं फूलंही दिलं... आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छाही दिल्या. 'लोक आजकाल इंग्लिश कॅलेंडरनुसार नवीन वर्ष साजरा करतात... यामुळेच, मीही विचार केला की यंदा घरीच नवीन वर्षाचा धूमधडाका करूयात' असं लालूंनी म्हटलंय. 

लालुंच्या आमंत्रणाला मान देऊन यावेळी बिहारचे मुख्यमंत्री जीतन राम मांझीदेखील त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले. दोघांमध्ये राजकीय चर्चाही झडल्या. 

2015 हे वर्ष बिहारच्या राजकारणासाठी अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहेत. कारण, वर्षाच्या शेवटी इथं विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच, आरजेडी आणि जेडीयू एकत्र येऊन या निवडणुकांना तोंड देतील आणि भाजपची घोडदौड थांबवण्याचा प्रयत्न करतील, असे आडाखे-तडाखेही बांधले जात आहेत.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.